गोरखपूर / उत्तर प्रदेश : योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूर सदरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते. कडेकोट बंदोबस्तात योगी आदित्यनाथ आणि अमित शहा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि औपचारिकता पूर्ण केली.
गोरखपुर(शहर) विधानसभा क्षेत्र से नामांकन से पूर्व… https://t.co/7xlAFgCRI0
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 4, 2022
योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधूनच पाच वेळा खासदार राहिले आहेत. गोरखपूर हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.