बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल फलटण पोलिसांनी घेतले ताब्यात
सातारा : राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ काल साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यसन मुक्त युवक संघटनेच्यावतीने दंडवत, दंडुका आंदोलन केले होते. यावेळी बंडातात्यांनी आंदोलनात सहभागी होत वाईन विक्रीच्या निर्णयावरून राजकिय पक्षांच्या महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर बंडातात्यांनी चुकन बोललो, असे सांगत माफी मागतो, असेही सांगितले होते.
राष्ट्रवादीसह भाजपच्या महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने आज सातारा शहर पोलिस ठाण्यात हभप बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याआधी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी बंडातात्यांवर काल रात्री गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे बंडातात्यांवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच महिला आयोगाने याची दखल घेत बंडातात्यांना नोटीस पाठवली आहे.
आज सकाळी बंडातात्या यांना महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल फलटण पोलिसांनी पिंप्रद येथील गोशाळेतून ताब्यात घेतले. तर आता सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बंडातात्या कराडकरांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आहे. ज्या-ज्या व्यक्तिंची नावे मि घेतली त्यांच्या बद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा प्रकार्चा आकस नाही. मी काही त्यांचा द्वेष करत नाही. राजकीय हेतुने कुणावरही आरोप किंवा टिप्पाणी केलेली नाही. अनावधानांन हे वकव्य केलं गेलं. त्याबद्दल मी माफी मागत आहे. असे बंडा तात्या कराडकर यांनी सांगीतले.