अर्थसंकल्पीय प्रस्ताव बैठकीत सोलापूरच्या विकासासंबंधी प्रस्तावांवर सकारात्मक चर्चा – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
सोलापूर : सोलापूर – मुंबई दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु व्हावी, रेल्वेचे सुरु असलेले विद्युतीकरण, दुहेरीकरण काम येत्या दोन महिन्यात पूर्ण व्हावे, टिकेकरवाडी टर्मिनल स्थानक करावे, अक्कलकोट रोड स्थानकावर बसवा व हसन एक्स्प्रेसला थांबा मिळावा यांसह मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील प्रलंबित कामांबाबत सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी लोकसभा सचिवालयातर्फे आयोजित अर्थसंकल्पीय प्रस्ताव सत्रात सोलापूर जिल्ह्याचे विषय मांडले.
लोकसभा सचिवालयाने (संदर्भ विभाग) “रेल्वे मंत्रालयासह सन २०२२-२३ साठी विविध मंत्रालये, विभागांसाठी अर्थसंकल्पीय प्रस्ताव” या विषयावर एक संक्षिप्त सत्राचे आयोजन केले होते. गुरुवारी संसद भवनात खासदारांसाठी आयोजित केलेल्या या सत्राच्या अध्यक्षस्थानी खा.अरविंद सावंत होते. या सत्रात सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी उपस्थित राहून वेगवेगळ्या विभागांतर्गत सादर केलेल्या प्रस्तावांची माहीती घेतली व चर्चेत सहभागी झाले. याप्रसंगी सोलापूरच्या विकासविषय व रेल्वेसहित वेगवेगळ्या विभागाच्या प्रकल्पाशी निगडित चर्चा केली. या समितीसमोर सोलापूरच्या बाबतीत अनेक विषय, प्रलंबित तसेच आगामी कामांची वस्तुस्थिती मांडली.
याप्रसंगी सोलापूरचा विकास अधिक गतीने होण्यासाठी सोलापूर मार्गे धावणारी मुंबई – हैदराबाद हायस्पीड रेल्वे अत्यंत आवश्यक आहे. अर्थसंकल्पात अधिक प्रोत्साहन दिलेली वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूर – मुंबई दरम्यान सुरु व्हावी, रेल्वेचे सुरु असलेले विद्युतीकरण सोलापूर मोहोळ दरम्यानचे काम रखडले आहे. तसेच दुहेरीकरण काम येत्या दोन महिन्यात पूर्ण व्हावे, सोलापूर स्थानकावर पडणारा भार पाहता जवळील टिकेकरवाडी स्थानकास टर्मिनल करावे. अक्कलकोट रोड स्थानकावर बसवा व हसन एक्स्प्रेसला त्वरित थांबा मिळावा. प्रवाश्यांची मागणी सलेली हुबळी-सोलापूर-नवी दिल्ली हि नवी गाडी लवकरात लवकर सुरु करावी.
यांसह मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील प्रलंबित कामांबाबत सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी लोकसभा सचिवालयातर्फे आयोजितअर्थसंकल्पीय प्रस्ताव सत्रात सोलापूर जिल्ह्याचे विषय मांडले. यामुळे रेल्वे मंत्रालयास इतर मंत्रालयाशी निगडित विषयांवर मुद्दे मांडल्याची माहिती खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली.