---Advertisement---

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात भीषण अपघात, सोलापूरचे चौघेजण अपघातात जागीच ठार

Follow Us:
---Advertisement---

सोलापुर : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात आज पहाटे साडे सहा वाजता ६ वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कारचा दोन मोठ्या वाहनांच्यामध्ये चेंदामेंदा झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर वाहनांमधील ३ जण गंभीर तर ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

दोन कंटेनर, दोन कार, टेम्पो व ट्रक अशा सहा वाहनांचा हा अपघात आहे. सर्व वाहने मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती समजताच आयआरबी, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे पथक, बोरघाट व खोपोली पोलीस यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत मयत व जखमी यांना वाहनांमधून बाहेर काढले.

अतिशय भीषण आणि वेदनादायी असा अपघात झाला असून यामध्ये दोन्ही कारचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. MH 46 AR 3877 या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने कंटेनरने पुढे जाणा-या MH13 BN 7122 या स्वीफ्ट कारला धडक दिली. स्वीफ्ट कार MH 10 AW 7611 या पुढे जणा-या आयशर टेम्पोमध्ये घुसली, टेम्पोने पुढे जाणा-या MH 21 BO 5281 या पुढील कारला जोरदार धडक दिली.

या अपघातात गौरव खरात (वय 36), सौरभ तुळसे (वय 32), सिद्धार्थ राजगुरू (वय 31), अजून एका जणाची ओळख पटलेली नाही. हे सर्वजण सोलापूरचे राहणारे आहेत. तर पवन अग्रवाल, मितेश वडोदे, अस्लम शेख तिघे ही (रा. जालना) वेन्यु कारमधील प्रवासी सुखरुप बचावले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!