तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.६ : जिल्हा परिषद सदस्या शिलवंती भासगी यांच्या प्रयत्नातुन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या सहकार्याने नागणसुर गावात साकारलेल्या साडे तीन कोटींच्या विविध कामांचा लोकार्पण सोहळा
तर नियोजित कामांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती युवा नेते मल्लिकार्जून भासगी यांनी दिली.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ होणार आहे.तसेच या कार्यक्रमात आदर्श माता व कोव्हिड योद्धा पुरस्काराने विशेष व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे.जि.प.सदस्या शिलवंती भासगी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे,जि.प.सदस्य आनंद तानवडे,मल्लिकार्जून पाटील,युवा नेत्या शितल म्हेत्रे,दुधनी बाजार कमिटीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे,पंचायत समितीचे सभापती आनंद सोनकांबळे,महिला
व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती शटगार,पंचायत समितीच्या सदस्या अनिता ननवरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे ,नगरसेवक अश्पाक बळोरगी,
विलास गव्हाणे,संजय देशमुख,सिद्धार्थ गायकवाड,बाबासाहेब पाटील,महिला
काँग्रेस अध्यक्षा मंगल पाटील,माजी
पं.स.सदस्य सतिश प्रचंडे,सरपंच अंबुबाई नागलगाव,उपसरपंच बसवराज गंगोंडा,धनराज धानशेट्टी,तंटामुक्त अध्यक्ष मल्लिनाथ कल्याण आदींची उपस्थिती राहणार आहे.सन २०१९ ते २०२२ या कालावधीत भासगी यांनी नागणसुर भागातील गावांमध्ये विविध कामांसाठी मोठा पाठपुरावा केला आहे.त्यांच्या माध्यमातुन या भागातील विकासाला चालना मिळाली असून मंगळवारी सायंकाळी ६ वाजता बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.