---Advertisement---

शांभवी फाऊंडेशन तर्फे दुधनी येथे महिलादिनी विविध कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.६ : जागतिक महिला
दिनाचे औचित्य साधून येत्या मंगळवार दि.८ मार्च रोजी दुधनी येथे शांभवी फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनच्या संस्थापिका वैशाली म्हेत्रे यांनी दिली.
सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मातोश्री लक्ष्मीबाई प्रशालेत महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये मोफत डोळे तपासणी यासोबतच नेत्र विकारांशी संबंधित शस्त्रक्रियेसाठी फाऊंडेशनकडुन सहकार्य ,ब्लड शुगर तपासणी,रक्त व रक्तातील घटकांसाठी सीबीसी तपासणी,थायराॅईड तपासणी करण्यात येणार आहेत.यासमयी कलबुर्गी येथील गव्हर्मेंट काॅलेजच्या डाॅ.शांता अष्टगी(नावदगी) यांचे महिला सशक्तीकरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.शांभवी फाऊंडेशनच्या माध्यमातुन दुधनी व भागातील महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.या सर्व कार्यक्रमांसाठी दुधनी व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!