काव्य संमेलनातून मराठी भाषेची समृद्धी वाढेल : पेडणेकर; राज्यस्तरीय काव्य संमेलनाचा अक्कलकोट येथे समारोप
अक्कलकोट, दि.२० : श्री स्वामी
समर्थांच्या पुण्यभूमीत मराठी साहित्याचा सुगंध दरवळणे ही बाब अभिमानाची आहे.या उपक्रमाने भाषेचे संवर्धन
होण्याबरोबरच मराठीची उंची निश्चितच वाढेल,असा विश्वास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन कै. कल्याणराव बाळासाहेब इंगळे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त कै.कल्याणराव
इंगळे महाविद्यालयात अकराव्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
त्याचा समारोप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,पत्रकार भरतकुमार मोरे,
प्रा. ए.डी.जोशी, परीक्षक मारुती कटकधोंड, ज्येष्ठ कवी राजेंद्र भोसले,वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांचा व प्रमुख गझलकार कवी यांचा सत्कार मंदिर समितीच्यावतीने इंगळे यांच्या हस्ते स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी महापौर पेडणेकर, सीईओ स्वामी यांच्या हस्ते कवी हेमंत रत्नपारखी लिखित शब्दतरंग, कवी राजेश साबळे लिखित गंध मातीचा, कवी श्यामल गोरे लिखित लेखणीला पंख फुटले, तर प्रातिनिधिक संग्रह संपादक नंदकिशोर पोटदुखे लिखित माझ्या विदर्भाच्या भूमीत या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संस्कृती गुरव या दहा वर्षाच्या मुलीने यावेळी कै. बाळासाहेब इंगळे यांच्या जीवनावर भाषण केले. यावेळी नागपूर येथील निशा खापरे, भंडारा येथील कविता कठाणे, जळगाव येथील हेमांगी भोंडे, गोंदिया येथील विजेता चन्नेकर, अमरावतीचे विजय बिंदोड, रत्नागिरीचे मुग्धा गुळवे, गोव्याचे सतीश सामंत, मुंबईचे विजय फडणीस, ठाण्याचे राजेश साबळे, पुण्याचे रणजित पवार, यवतमाळ येथील दीपक सपकाळ,सोलापूर येथील खाजाभाई बागवान आदींसह राज्याच्या विविध भागातून आलेले १२० कवी व ५० गझलकार यांनी सादर केलेल्या विविध विषयांवरील काव्यसंग्रहामुळे महाविद्यालयाचे परिसर काव्यमय झाले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काव्यप्रेमी शिक्षक मंचचे सदस्य आनंद घोडके, कालिदास चवडेकर, प्रमोद बाविस्कर, सत्येंद्र राऊत, रजिया जमादार, दीपक सपकाळ, सुभाष सुरवसे, नीलोफर फणीबंध, जमलोद्दीन शेख, सुनिता किरनळ्ळी, रूपाली काळेकर, शरणप्पा फुलारी, नवनाथ खरात, बंटी नारायणकर, मगदूम, अरुण शिंदे, चित्तरंजन अगरथडे, धनंजय माने, विपुल कडबगांवकर, कृष्णा शिंदे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास मंदिर समितीचे विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे, शिवशरण अचलेर यांचे सहकार्य लाभले.
स्वतंत्रपणे कवी संमेलन
घेण्याचा प्रयत्न करणार
काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे जतन व संवर्धन होत आहे.ही प्रेरणा घेऊन आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे कवी संमेलन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कन्नड भागाला लागून असलेल्या अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागात माय मराठीची सेवा करण्याचा प्रयत्न शिक्षक कवी करत आहेत त्याचा मला आनंद वाटतो.
दिलीप स्वामी, सीईओ सोलापूर