तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे श्री सद्गगुरु यल्लालींग महाराज व श्री परमानंद महाराज मठ यात्रा महोत्सवनिमित्त
आयोजित करण्यात आलेल्या विविध
धार्मिक कार्यक्रमाला मंगळवारपासून प्रारंभ झाला.यानिमित्त ३ मे ते १४ मे पर्यंत अखंड महाप्रसाद सेवेचे हे आयोजन करण्यात आले आहे. मध्यंतरी कोरोनामुळे यात्रा खंडित झाली होती.निर्बंध हटल्याने सालाबादाप्रमाणे सर्व कार्यक्रम पार पडत आहेत.हे सर्व कार्यक्रम श्री. श्री. श्री बालयोगी विठ्ठललिंग महाराज यांच्या दिव्य सानिध्यात पार पडणार असल्याची माहिती ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आली आहे.
पहिल्या दिवशी बिरलिंगेश्वर डोळीन गायन संघ हलसंगी (ता.इंडी ) मुख्य गायिका कु. अंबिका तळवार यांचे व अमोगसिद्धेश्वर डोळीन गायन संघ (कलबुर्गी ) मुख्य गायिका कु. लक्ष्मी पुजारी यांचे सुमधूर गायन झाले.रात्री श्री अमोगसिद्ध महाराज हरकेरी यांच्या जीवन चरित्रावर श्री परमपूज्य अभिनव सिद्धरत्न मदगोंडेश्वर महाराज (संगोळगी) यांचे
प्रवचन पार पडले.या पुरणाची समाप्ती १३ तारखेला होणार आहे.१४ मे रोजी मुख्य कार्यक्रमाची सांगता होणार आहे.यासाठी भरमणा पुजारी,नितीन चव्हाण,सोमनिंग तामदंडी,उपसरपंच भीमा सुरवसे,उत्तम पवार,काशिनाथ नागशेट्टी,भास्कर माने,
श्रीमंत पुजारी,धोंडूशा माने,आप्पाशा पुजारी,अमोल पवार,बाळू पवार,बिरु माळगे,सिद्धार्थ शिवशरण यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.