अक्कलकोट,दि.२२ : नागनाथ विद्या विकास प्रशाला कुरनूर येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मेळावा उत्साहात पार पडला.सन १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा मेळावा घेतला.अध्यक्षस्थानी प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर निंबाळकर होते.
या मेळाव्यास ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व विद्यार्थी आपापली नोकरी, व्यवसाय, दुकान , राजकारण, समाजकारण , शेतीमध्ये मोठ्या जिद्दीने काम करीत आहोत, असे मनोगतातून सांगितले. प्रत्येकाने आपल्या वर्गातील आठवणीला उजाळा दिला. सर्व शिक्षकांच्या अध्यापनाची आठवण केली. पुन्हा एकदा आम्हाला शाळेला यावेसे वाटते. शाळेत मज्जा मस्ती करावीशी वाटते.वार्षिक एक लाखापासून एक कोटी पर्यंत उत्पन्न कसे घेतो. हे प्रत्येकाने आपल्या कामाचा आराखडा सांगितला. आम्ही कितीही मोठे झालो तरी आम्ही विद्यार्थीच आहोत. आम्ही शाळेला व आमच्या गुरूंना कधीही विसरणार नाही,
असा विश्वास व्यक्त करताना विद्यार्थ्यांचा कंठ दाटून आला होता.यावेळी स्वामीराव सुरवसे, हरिदास जाजनुरे, ढोनसाले, मदार शेख,सुरेश माने, परशुराम बेडगे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . संजीव जंगाले, विक्रम बेडगे ,नारायण बागल, श्रीशैल स्वामी, फुरकान मनियार ,अनिल काजळे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रशालेच्या स्थापनेपासून ३९ वर्षाच्या इतिहासात प्रथमच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला.माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेस स्पीकर संच भेट देण्यात आला. मुख्याध्यापक महादेव माने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.संस्थेचे संस्थापक स्व. केशवराव माने, अध्यक्ष स्वामीराव माने, अंकुशराव काजळे, मुख्याध्यापक एच. एम. सुरवसे, गुरुलिंग वस्त्रे ,शिवशंकर स्वामी, बाबुराव बागल, रमेश काळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी लक्ष्मण बावडे,भक्ती मोरे, सुवर्णा निंबाळकर, वर्षाराणी पाटील, बाई बिराजदार, रेखा जाधव,सरिता इनामदार ,सुवर्णा साळुंके,महावीर कासार, विनोद पवार रामहरी मोरे , भीमराव सुरवसे, राजेंद्र मोरे, विश्वनाथ सुरवसे,काशिनाथ कलशेट्टी, प्रवीण पाटील, व्यंकट मोरे आदी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी मोरे व आभार किशोर कासार यांनी मानले.