---Advertisement---

सोलापूर येथील युवा कलेक्शनचा री – ओपनिंग सोहळा थाटात; सिने अभिनेत्री अमृता खानविलकरांची हजेरी

Follow Us:
---Advertisement---

 

मारुती बावडे

सोलापूर,दि.२२ : नमस्कार सोलापूरकरहो,
मी अमृता खानविलकर असे म्हणताच शेकडो तरुण-तरुणींनी एकच जल्लोष केला अन शेकडो मोबाईल ऑन झाले.पुन्हा एकदा नमस्कार सोलापूरकरहो माझ्यावर केलेल्या प्रचंड प्रेमाबद्दल आपले मनःपूर्वक आभार असे म्हणताच शिट्ट्यांचा आवाज आणि आणि चंद्रमुखी चित्रपटातील गाण्याची धून
अशा दुहेरी संगमात रम्य सायंकाळी सोलापूरकरांनी सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांचे अपूर्व जल्लोषात जोरदार स्वागत केले.निमित्त होते सोलापूरातील नवी पेठेतील युवा कलेक्शनच्या रिओपनिंगचे. प्रारंभी गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे व युवाचे मालक कपिल शिंदे व शिंदे परिवाराने त्यांचे सोलापूरकरांच्यावतीने स्वागत केले. यानंतर संवाद साधताना त्या म्हणाल्या की, सोलापूरचे मटण आणि शेंगा चटणी ,कडक भाकरी मला खूप आवडली आणि ताव मारला असे म्हणतात पुन्हा एकच जल्लोष पाहायला मिळाला.मी साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेवर सोलापूरकरांनी प्रचंड दाद दिली आहे.महाराष्ट्राने वाहवा दिली.प्रेम दिले याबद्दल शतशः ऋणी आहे असेच प्रेम असेच सहकार्य यापुढेही आपण करत राहावे, अशा भावना व्यक्त केल्या.युवा कलेक्शनमुळे सोलापूरच्या ग्राहकांना निश्चितच नवे काही तरी मिळेल आणि यातून सोलापूरची उंची वाढेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शिंदे परिवाराने आयोजित केलेल्या या दिमाखदार सोहळ्याला मनापासून शुभेच्छा दिल्या.प्रारंभी लकी चौक
येथे सायंकाळच्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात अमृता खानविलकर यांची गाडी येताच रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांनी उभे राहून खानविलकर यांचे आदरपूर्वक स्वागत केले.यावेळी ज्येष्ठ नेते बलभीम शिंदे,गोकुळ शिंदे, विशाल शिंदे, दत्ता शिंदे यांच्या पत्नी प्रीती शिंदे, श्वेता शिंदे, कुसुम शिंदे,कल्पना शिंदे, अश्विनी शिंदे, निकिता शिंदे, अवनी शिंदे व परिवार उपस्थित होता.या शोरूमचे मॅनेजर बाजीराव यादव आणि अमित सातलगावकर यांनी सर्व सेक्शनची माहिती दिली. या सोहळ्याला सज्जन निचळ,दत्ता तानवडे, तुकाराम बिराजदार, व्यंकट मोरे,राजू चव्हाण, अभिजीत गुंड, कार्तिक पाटील,महेश माने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.दोन तास चाललेल्या या सोहळ्यात सोलापुरातील विविध मान्यवरांनी शिंदे परिवाराला यानिमित्त बुके देत शुभेच्छा दिल्या.गेल्या पंधरा वर्षापासून युवा कलेक्शन हे लक्की चौक नवी पेठ येथे कार्यरत आहे.परंतु यावेळी सोलापूरकरांना नवे काहीतरी मिळावे,यासाठी अद्ययावत शोरूमचे पुन्हा एकदा उद्घाटन झाले.या माध्यमातून ग्राहकांना नवीन ब्रँड, किड्स, लेडीज,मेन्स अशा सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे मिळतील.शोरूम संपूर्ण वातानुकूलित असून ती मध्यवर्ती ठिकाणी आहे सर्व सुविधांनी युक्त असल्याने ती ग्राहकांना निश्चितच आवडेल,असे विश्वास युवा कलेक्शनचे मालक कपिल शिंदे यांनी सांगितले.

सेल्फीचा प्रचंड पाऊस
अन अमृताताईंचे हास्य !

या कार्यक्रमादरम्यान सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांनी अनेकांना आनंदी होत सेल्फी दिला.अनेक तरुण – तरुणी सेल्फीसाठी प्रचंड गर्दी केली होती. या सोहळ्याला सोलापूरकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी हात उंचावून सर्वांचे आभार मानले.शिंदे परिवाराचे देखील यावेळी त्यांनी
कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!