---Advertisement---

गुरूस्थान वटवृक्ष मंदिरात साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव; भाविकांच्या सेवेसाठी मंदिर समिती सज्ज : इंगळे

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.११ : स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात गुरु पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुपौर्णिमेच्या या महतीमुळेच या दिवशी प्रचंड मोठया संख्येने स्वामींच्या दर्शनाकरीता भाविक गर्दी करतात,अशी माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश
इंगळे यांनी दिली. यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव
बुधवार दि.१३ जुलै रोजी आहे. या दिवशी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील नित्यनियमाने होणारी काकड आरती पहाटे ५ वाजता होईल. दर्शनाकरीता या दिवशी स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे. स्वामी भक्तांची संभाव्य गर्दी पाहून सर्व स्वामी
भक्तांना टप्प्या टप्प्याने दर्शनास सोडण्यात येईल.स्वामी भक्तांच्या या वाढत्या गर्दीमुळे
सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता स्वामी भक्तांचे नित्य नियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. या दिवशी जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद मिळेल. दुपारी ११:३० वाजता पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींना महानैवेद्य दाखवून नैवेद्य आरती संपन्न होईल व शेजारती रात्री ७ : ४५ ते ८ : ४५ यावेळेत संपन्न होईल. गुरूपौर्णिमेनिमीत्त दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या वतीने मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे सर्व स्वामी भक्तांसाठी भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. तरी सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!