---Advertisement---

चपळगाव येथून हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.८ : आझादी का अमृत महोत्सवांतर्गत शासनाच्यावतीने सुरू असलेल्या स्वराज्य अभियान व हर घर तिरंगा,घर घर तिरंगा अभियानाला चपळगावातून प्रारंभ
झाला.या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी सरपंच उमेश पाटील होते.यावेळी बोलताना आमदार कल्याणशेट्टी यांनी आपल्या मनोगतात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षांत हर घर तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून भारताचा दैदीप्यमान इतिहास मांडला. तहसीलदार बाळासाहेब सिरसट, गटविकास अधिकारी सचिन खुडे ,महावितरणचे अभियंता संजय म्हेत्रे यांनी ध्वज संहिता व नियम यावर सविस्तर विवेचन केले. सरपंच उमेश पाटील यांनी भारतीयांचा व प्रत्येक गावातील नागरिकांचा सहभाग व या उपक्रमाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमास अंबणप्पा भंगे, महादेव वाले ग्रा.पं. सदस्य श्रावण गजधाने, परमेश्वर वाले,गणेश कोळी,मल्लिनाथ सोनार, विलास कांबळे,महेबूब तांबोळी, स्वामीराव जाधव, मनोज इंगोले सुरेश सुरवसे, राजा कोळी वनीकरण अधिकारी अहिरे ,विस्ताराधीकारी तुळजापूरे,मंडलाधिकारी आर.एम.कोळी,ग्रामविकासाधिकारी बी.एस. कोळी, तलाठी जारवाल,हन्नूरचे अभियंता वराडे , पोलीस पाटील चिदानंद हिरेमठ यांच्यासह शासकीय,निमशासकीय अधिकारी,पदाधिकारी अंगणवाडी सहायक व सेविका, शिक्षक, सेवक व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी तर आभार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेश पाटील यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!