अक्कलकोट,दि.१४ : सशस्त्र क्रांतीचे जनक आदय गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त आपुलकी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने संस्थेच्या आवारात गरजु मातंग व कंत्राटी पन्नास झाडू महिला कामगारानां विशाल राठौर यांच्या अध्यक्षतेखाली दिपावलीनिमित्त साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .
भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . प्रारंभी लहुजी वस्ताद साळवे आणि पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन व पुष्पहार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी मान्यवरांचे स्वागत व संस्थेच्या कार्याची माहिती प्रस्तावनेत
दिली . यावेळी चंद्रकांत कलशेट्टी,सरफराज शेख, नवनीत राठोर, रमेश वाले,राहुल राठोर प्रकाश टाके, शिवलिंग स्वामी, भारतीय लहुजी सेना पान मंगरूळ शाखाध्यक्ष अनिल केंगारे, शैलेश राठोर,भिमा जगताप, रशीद खिस्तके, राजू शिंपळे, वैजनाथ मुकडे, नितीन कटारे, संजय घनाते आदि मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन कटारे यांनी केले तर आभार भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी मानले.
आपुलकी संस्थेच्यावतीने गरीब महिलांना साडी वाटप, वसंत देडे यांनी घेतला पुढाकार
On: November 14, 2020 9:22 PM
---Advertisement---










