
अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोट तालुक्यात यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे.या पार्श्वभूमीवर
मातोश्री लक्ष्मी शुगर ऊस गाळपासाठी सज्ज
असून कारखान्यावरील सर्व यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.
रुददेवाडी (ता.अक्कलकोट) येथील मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचा दहावा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला.त्यावेळी ते
बोलत होते.पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले,गेल्या वर्षीही कारखान्याला ऊस घालून शेतकऱ्यांनी सहकार्य केले. शेतकऱ्यांचे ऊस बिले वेळेत टाकण्याचा प्रयत्न केला.यावर्षीही शेतकऱ्यांचे बिल तात्काळ जमा करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे.तालुक्यात
पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे याचा विचार करून जास्तीत जास्त गाळप करण्याचा आमचा प्रयत्न आहे.अक्कलकोट तालुक्यात कुरनूर धरण व भिमा नदीचा काठचा परिसर तडवळ भाग आणि तलाव क्षेत्रातील गावात उसाचे प्रमाण जास्त आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले. कारखान्यातील विभागवार सर्वच पातळीवर वाहन,तोडणी,यंत्रसामग्रीची तयारी चांगली केली असल्याचे म्हेत्रे यांनी यावेळी सांगितले.प्रारंभी होम हवन आणि विधिवत पूजा करण्यात आली.त्यानंतर म्हेत्रे यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.यावेळी युवा नेत्या शीतलताई म्हेत्रे,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बाळासाहेब कुटे,जनरल मॅनेजर आर.के.गदादे,चीफ इंजिनियर एन.एन.बिराजदार,चीफ केमिस्ट एम.एस माळशेट्टी,गुरुनाथ लोहार,केन मॅनेजर के.एल.होसूरे,डेप्युटी केन मॅनेजर एस.एस गुरव,एम.डी शिरसे,विश्वनाथ हडलगी यांच्यासह सर्व खाते प्रमुख,उपखाते प्रमुख,
कर्मचारी,नेते मंडळी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदा ९ लाख मेट्रिक
टन गाळपाचे उद्दिष्ट
यावर्षी कारखान्याने ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतिसादामुळे ५ लाख २७ मेट्रिक टनापर्यंत गाळप झाले होते.शेतकऱ्यांना वेळेत बिल आणि जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न राहील.
सिद्धाराम म्हेत्रे,चेअरमन