शिक्षक आणि अभियंत्याचे कार्य चिरकाल टिकते : वठारे; अक्कलकोट लायन्स क्लबच्या आदर्श शिक्षक व अभियंता पुरस्कारांचे वितरण
अक्कलकोट दि.१३ : शिक्षक आणि अभियंते हे समाजाचे मार्गदर्शक असून त्यांनी केलेले कार्य समाजामध्ये चिरकाल टिकते.त्यांचा गौरव करणे काळाची गरज आहे हे कार्य लायन्स क्लबच्या माध्यमातून होत आहे,ही बाब कौतुकास्पद असल्याचे जिल्हा परिषदच्या उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी सांगितले.गुरुवारी,अक्कलकोट येथील लायन्स क्लबच्या सभागृहात लायन्स क्लबच्यावतीने आदर्श शिक्षक
व अभियंत्यांचा गौरव विविध मान्यवरांच्या
हस्ते करण्यात आला.त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे,प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार,लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र हत्त्ते,क्लब सचिव संतोष जिरोळे,डॉ.सुनील बिरादार,
महेश हिंडोळे,बाबासाहेब निंबाळकर,प्रभाकर मजगे,शिवपुत्र हळगोदे,डॉ.प्रदीप घिवारे,जावेद पटेल,सुधीर माळशेट्टी,प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीदेवी खुने, शिशुच्या मुख्याध्यापिका महानंदा निलगार आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन,सर डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मसुती यांनी केले.यावेळी बोलताना विस्तार अधिकारी भांजे यांनी शिक्षकांचे आणि अभियंत्यांचे काम अधोरेखित करून समाजाला या दोघांची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. बिराजदार यांनी आपल्या शैलीदार भाषणातून या दोघांमुळे समाजावर चांगले संस्कार होतात आणि यामुळे घराला खऱ्या अर्थाने घरपण प्राप्त होते,असे सांगितले.यावेळी पुरस्कारकर्त्यांमधून शेटे आणि फुलारी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शिक्षक दिनानिमित्त लायन्स शाळेतील २७ शिक्षिकांचा सन्मान मान्यवरांचा
करण्यात आला.कार्यक्रमास ह.भ.प गुरव महाराज,स्वामींनाथ हरवाळकर,मोहन चव्हाण,सुभाष खमितकर,शदीद वळसंगकर,विठ्ठल तेली,गुरुपादप्पा आळगी,प्रकाश उन्नद,अप्पू संगापुरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संगीता बिराजदार व सुभाष गडसिंग यांनी केले तर आभार डॉ.बिरादार यांनी मानले.
‘या ‘ दहा जणांचा झाला गौरव ..
यावेळी प्रा.बाळासाहेब पाटील,रवींद्र नवले,राजशेखर मंठाळे, अभय शेटे,अन्नपूर्णा रामशेट्टी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर आदर्श अभियंता पुरस्कार प्रा.मल्लू माने,प्रा.धीरज जनगोंडा, प्रा.वैजनाथ खिलारी,उपप्राचार्य विजयकुमार पवार,उद्योजक गणपती फुलारी यांना
पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात
आले.