---Advertisement---

विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये अंघोळ करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ… वाचा सविस्तर

On: September 18, 2022 12:24 PM
Follow Us:
---Advertisement---

पंजाब : पंजाबमधील मोहालीस्थित चंदीगड विद्यापीठातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये अंघोळ करत असलेल्या साठ मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. हॉस्टेलमधीलच एका विद्यार्थीनं साठ मुलींचा व्हिडिओ तयार केला असून त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगड विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीनं हॉस्टेलमधील साठ मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट केला, त्यानंतर तिनं शिमल्यात राहाणाऱ्या एका मित्राला तो व्हिडिओ पाठवला. त्यानं तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यापीठातील आठ विद्यार्थीनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्यातल्या एका विद्यार्थीनीची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे.

मध्यरात्री जवळपास अडीच वाजता काही विद्यार्थीनी युनिव्हर्सिटीच्या गेटजवळ पोहोचल्या आणि जोरजोरदात घोषणाबाजी करू लागल्या. मुलींच्या वसतीगृहातील एका मुलीनं आपल्या सहकारी विद्यार्थींनीचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. एक दोन नव्हे, तर तब्बल ६० विद्यार्थींनीचे व्हिडिओ तिनं रेकॉर्ड केले होते. हे व्हिडिओ ती एका मुलाला पाठवत असे. संबंधित मुलगा हे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करत होता. हे धक्कादायक प्रकरण युनिर्व्हसिटीच्या प्रशासनाला लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करत आहेत.

आरोपी विद्यार्थीनीची ओळख पटवण्यात आली आहे. तसंच हॉस्टेलमध्ये युनिव्हर्सिटी प्रशासनानं इतर विद्यार्थींसमोर याप्रकरणाबाबत तिला जाबही विचारला आहे. तिनं आपला गुन्हा कबूल करत खूप आधीपासूनच विद्यार्थीनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचं तिनं मान्य केलं आहे. ती हे व्हिडिओ ज्या मुलाला पाठवत होती तो शिमला येथील रहिवासी असल्याचं तिनं सांगितलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!