उत्तराखंड : देवभूमी उत्तराखंडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात १० गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जणांचा शोध सुरू आहे. द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर हिमस्खलनामुळे नेहरू पर्वतारोहण संस्थेचे दोन डझनहून अधिक प्रशिक्षणार्थी अडकल्याची माहिती मिळाली आहे.
यासंदर्भात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्या ट्विट मध्ये धामी म्हंटले आहे की, ‘’हिमस्खलनात अडकलेल्या पर्वतारोहण प्रशिक्षणार्थींना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी आणि आयटीबीपीचे जवान जलद मदत आणि बचाव कार्य करत आहेत. भारतीय हवाई दलाने मदत आणि बचाव कार्यासाठी दोन चित्ता हेलिकॉप्टर पाठवले आहेत’’.
प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झाला. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफचे पथक डेहराडूनमधील सहस्त्रधारा हेलिपॅडवरून द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर हिमस्खलनात अडकलेल्या प्रशिक्षणार्थींना वाचवण्यासाठी रवाना झाले.
उत्तराखंड चे मुख्यमंत्री पुष्करसिन्ह धामी म्हणाले की, त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलले आहे, आणि बचाव कार्य जलद करण्यासाठी लष्कराला मदत करण्याचे आवाहन केले आहे. धामी म्हणाले, त्यांनी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सर्वांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विटरवर जाऊन जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि कुटुंबातील सदस्य गमावलेल्या शोकाकुल कुटुंबांचे सांत्वन केले.
Deeply anguished by the loss of precious lives due to landslide which has struck the mountaineering expedition carried out by the Nehru Mountaineering Institute in Uttarkashi. My condolences to the bereaved families who have lost their loved ones. 1/2
— Rajnath Singh (@rajnathsingh) October 4, 2022