---Advertisement---

अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपाने पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते – अजित पवार

Follow Us:
---Advertisement---

पुणे : सोमवारी पुण्याला पावसाने हाहाकार माजवला. संपूर्ण पुण्यातील रस्ते गुडघाभर पाण्याने भरलेले होते. त्याचे फोटो व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे.

भाजपने स्मार्टसिटीचे स्वप्न दाखवून पुणे शहराचा वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपाने पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला ‘अव्यवस्थेची ’ कारण काय आहेत ती सांगावीच लागतील, अशी टीका त्यांनी ट्विटरवरून केली आहे.

 

तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करतो. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!