तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, : युनायटेड वे मुंबई संस्थेच्या अंमलबजावणीमध्ये आणि जॉन डियर इंडिया प्रा.लि. यांच्या अर्थसाहाय्य मधून जलसंजीवनी २.० प्रकल्पा अंतर्गत ६०० कुटुंबांना ३ हजार फळरोपांचे वाटप करण्यात आले. चार जिल्हा परिषद शाळेला विविध प्रकारच्या स्थानिक प्रजात्तीचे ३८५ रोपे देण्यात आली. आंबा, पेरू, चिक्कू, लिंबू, शेवगा, सीताफळ आदी फळरोपांचे प्रत्येक कुटुंबांला प्रत्येकी पाच रोप देण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे, बऱ्हाणपूर, हालहळ्ळी (अ) आणि दक्षिण सोलापूर मधील तीर्थ या गावामध्ये हा उपक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी एस. बी. कोळी, टीम लीडर भीमाशंकर ढाले, समूह संघटक अजिज तांबोळी, कृषीतज्ञ गणेश वाघमोडे, अभियंता कृष्णा खेंडके, डोंबरजवळगे सरपंच चिदानंद माळगे, बऱ्हाणपूरचे उपसरपंच इमामुद्दीन पीरजादे, सचिन बिराजदार आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्ये उपस्थित होते. प्रकल्पा अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्यामध्ये गावात वृक्ष लागवड व्हावी आणि प्रत्येक कुटुंबाला आरोग्यविषयक पोषक फळ मिळावे या हेतूने फळरोपे वाटप करण्यात आली. लाभार्थी कुटुंबाकडून ५० रुपये नाममात्र सहभाग घेऊन पाच रोप देण्यात आली. या उपक्रम यशस्वीतेसाठी क्षेत्र समन्वयक मनोद्दीन पटेल आणि नागराज पाटील, समूह सखी अंजना ईरवाडकर, पुजा बिराजदार, विरश्री सुलगडले, लक्ष्मी कुर्ले यांनी परिश्रम घेतले.
४८ शेतकऱ्यांना बियाणे वाटप
जलसंजीवनी २.० प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी ज्वारी सीएसव्ही २९ आर या वाणाच्या बियाणाचे चार गावातील २४ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. तसेच फुले विक्रांत या वाणाचे हरभरा बियाणे आणि निविष्ठा २४ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. या लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र (खेड) सोलापूर येथे हरभरा लागवड व रब्बी ज्वारी संशोधन केंद्र सोलापूर येथे ज्वारी लागवड पिकांचे प्रशिक्षण देण्यात आले.