पंतप्रधान मोदीनी कारगिलमधील जवानांसोबत साजरी केली दिवाळी..

जम्मू : दरवर्षीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी देखील जम्मू काश्मीरमधील कारगिलमध्ये जवानांसोबत साजरी केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जवानांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी जवानांना संबोधित करत बोलताना पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. वर्षानुवर्षे माझ्यासाठी तुम्ही सर्व माझे कुटुंबीय आहेत. माझ्या दिवाळीचा गोडवा तुमच्यामध्ये वाढतो, माझ्या दीपावलीचा प्रकाश तुमच्यामध्ये आहे जे पुढील दिवाळीपर्यंत माझे स्थान वाढवते.

पाकिस्तानसोबतचे एकही युद्ध असे झाले नाही जिथे कारगिलने विजयाचा झेंडा फडकवला नाही. दिवाळी म्हणजे दहशतवाद संपवणारा उत्सव. कारगिलनेही तेच केले. एखाद राष्ट्र अमर असते जेव्हा तिची मुलं, तिचे शूर पुत्र आणि मुलांचा त्यांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असतो. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘’शांततेशिवाय सामर्थ्यवान होणं शक्य नसून सरकारनं युद्धाला शेवटचा पर्याय मानलेलं आहे. दहशतवाद्यांच्या अंत करत दिवाळी साजरी करणं हाच खरा दिवाळीचा अर्थ’’ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भारतीय सैन्यानं आतंकवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचं कौतुक करताना पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, द्रास, बटालिक आणि टायगर हिल तुकड्यांच्या शूरतेचा मी साक्षी आहे. भारतीय सैन्यानं कारगिलमधील दहशतवादाचा नायनाट केला असून त्याचा मी साक्षीदार असल्याचं म्हणत जवानांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. याशिवाय आता सैन्यात महिलांनाही स्थान मिळालं असल्यानं आमच्या मुली सैन्यात आल्यानं तिन्ही दलांची ताकद आणखी वाढणार असल्याचंही मोदी म्हणाले.

Leave a Comment