दिल्ली : २०३५ पर्यंत भारतने स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याची योजना आखली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने एक योजना आखली आहे. इस्रो अवजड पेलोड्स कक्षेत सोडण्यासाठी आणि पुन्हा वापरता येण्या जोगे रॉकेट तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या रॉकेटला नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेईकल्स (एनजी एलव्ही) असे म्हटले जात आहे. इस्रोचे या रॉकेटच्या डिझा ईनवर काम सुरू असून त्याच्या विकासात उद्योगांनी सहकार्य करावे, असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे.
उद्योग क्षेत्राने विकास प्रक्रियेसाठी सहकार्य करावे, आम्हाला सर्व पैसे गुंतवण्याची गरज नाही. सर्वांच्या कल्याणासाठी उद्योग जगतानेही गुंतवणूक करावी अशी आमची इच्छा आहे. रॉकेट दहा टन पेलोड जिओस्टेशस्टेनरी ट्रन्सफर ऑर्बिट किंवा वीस टन पेलोड पृथ्वीच्या कक्षेत कमी अंतरावर नेण्याची योजना असल्याचे सोमनाथ यांनी सांगितले. नवीन रॉकेट उपयुक्त ठरणार असून अंतराळ मोहिमा, मानवासह अंतराळ मोहिमा, मालवाहू मोहिमा आणि एकाच वेळी अनेक संचार उपग्रह कक्षेत ठेवणे हे सर्व अंतराळ स्थानकामुळे सोपे होणार आहे. या नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेईकल्स रॉकेटमुळे अंतराळातील वाहतूक किफायतशीर होणार आहे.