आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू संदर्भात केलेल्या वक्तव्यावर व्यक्त केली दिलगिरी, बच्चू कडू यांनी दिली ‘’ही’’ प्रतिक्रिया
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून रवि राणा आणि बच्चू कडू या दोन आमदारांमध्ये सुरू असलेली शाब्दीक चकमक राज्यभरात चर्चेचा विषय बनली होती, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवि राणा आणि आमदार बच्चु कडू यांच्यामध्ये झालेल्या बंद दाराआड चर्चेनंतर या वादावर तोडगा निघाला आणि या वादावर अखेर पडदा पडला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रसार मध्यमाशी बोलताना आमदार रवि राणा म्हणाले की, “बच्चु कडू आणि मी दोघेही सरकारमध्ये आहोत आणि आमदार आहोत. आमच्या वादा पेक्षा जनतेला न्याय देणं महत्त्वाचे आहे. शिंदे समर्थकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी शब्द मागे घेतो. बच्चु कडू बद्दल मी माझे वाक्य परत घेतो.” आणि दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले. आमदार रवी राणा यांनी आपला वक्तव्य मागे घेतल्यानंतर बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तरी अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अद्याप आपण माघार घेतली नसल्याचे संकेत दिले आहेत. बच्चू कडूंनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, रवी राणांनी आपले शब्द मागे घेतले असले तरी याबाबत कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेणे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. आज संध्याकाकळी त्यांचे मत ऐकून घेतल्यानंतर मी माझी भूमिका उद्या स्पष्ट करणार आहे.