अक्कलकोट, दि.1 : कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट येथे सोयाबीनची विक्रमी आवक होत असल्याची माहिती आडत व्यापारी राजशेखर हिप्परगी यांनी दिली. बॅगेहळ्ळी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिमीतील श्री बसवेश्वर मार्केट यार्डात अक्कलकोट तालुक्यातील जेऊर, वागदरी, बादोला, काझीकणबस या पंचक्रोशीतून सोयाबीनची आवक अडीच ते तीन हजार पोतीची विक्रमी होत असून सध्या 4900 ते 5300 पर्यंत दर मिळत आहे. रोजच्या रोज सौदा, रोजच्या रोज मालाची पट्टी दिली जात असल्याची माहिती राजशेखर हिप्परगी यांनी दिली आहे.
सोयाबीन खरेदी विक्री होत असताना हवा, मॉयश्चराइज पाहून त्याचा दर निश्चित होत असतो. दिवसेंदिवस उडीद आणि तूरीचे क्षेत्र कमी होत असून सोयाबीन व सुर्यफुलचे क्षेत्र वाढत आहे. नजीकच्या बाजार समितीपेक्षा शेतकर्यांना चांगला दर मिळत आहे. याप्रसंगी आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष स्वामीनाथ हिप्परगी, स्वामीनाथ नागुरे, राजु कोळी, प्रकाश करकी, कांत हिळ्ळी, महादेव डोंगरे, विजयकुमार कापसे, सैपन बागवान, रौफ बागवान यांच्यासह शेतकरी व आडत व्यापारी उपस्थित होते.