अक्कलकोट : आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणजे अक्कलकोट तालुक्याला मिळालेले विकासाभिमुख नेतृत्व तर आहेच पण अनमोल रत्न देखील आहे. प्रत्येकांना सढळ हाताने मदत करणे आणि प्रत्येकाला आधार देणे याकामी ते आता व्यक्ती राहिले नाहीत तर एक सामाजिक संस्था म्हणून विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे आले आहेत. त्यांनी अल्पावधीत मोठे कार्य या तालुक्यात उभे केले आहे. आता ते सध्या तालुक्याचे आमदार आहेत त्यामुळे गावागावात त्यांच्या माध्यमातून विकास गंगा पोचली आहे.यापूर्वीच्या इतिहासावर जर एक नजर टाकली तर अक्कलकोटला आंतरराष्ट्रीय योगगुरू बाबा रामदेव यांचे तीन दिवसीय योग शिबिर त्यांनीच घेतले.
वळसंग येथे शेतकरी मार्गदर्शन शिबिर घेतले.विजयपूर येथील सिद्धेश्वर महास्वामी यांचे धार्मिक प्रवचन दोन वर्षांपूर्वी श्रावण मासात पूर्ण महिनाभर अक्कलकोटच्या फत्तेसिंह मैदानावर घेतले गेले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील गरजा ओळखून त्याप्रमाणे काम करण्याची हातोटी आणि त्यासाठी असलेले संघटन कौशल्य आणि युवकांची मजबूत फळी निर्माण झाली.
प्रतिष्ठान नेहमीच अग्रभागी राहिले आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घौडदौड सुरू आहे. विवेकानंद प्रतिष्ठानने जपलेली सामाजिक बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे. प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात शेकडो जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. गणेशोत्सवात गेल्या दहा वर्षांपासून अक्कलकोट तालुकावासियांसाठी बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.पाणीटंचाई दूर करण्यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान यांच्या वतीने वर्षभर रद्दी गोळा केली जाते. या रद्दीच्या पैशातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते.
आरोग्य शिबिर व ग्राम स्वच्छता अभियान, कोरोनाच्या काळात १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले. तालुक्यातील अनेक गावाच्या तलावातील गाळ काढून त्याचा पाणीसाठा वाढविण्यात आला.तलावाती गाळ शेतकऱ्यांना देऊन शेतजमिनीची सुपिकता वाढविण्यास मदत करण्यात आली. काही गावातील ओढ्यांचे खोलीकरण करण्यात येऊन जलसंधारण कार्यास बळ देण्यात आले अशी अनेक कामे सांगता येतील. अनेक प्रभावी सामाजिक उपक्रम राबवून प्रतिष्ठानने वेगळेपण सिद्ध केले आहे.
तरुणांवर चांगले संस्कार व्हावेत, गरजूंना मदतीचा हात मिळावा, व्यापाऱ्यांना अल्पदरात कर्ज उपलब्ध व्हावे, सुदृढ आरोग्य लाभावे, ज्ञानवृद्धी व्हावी यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मार्गदर्शक सचिन कल्याणशेट्टी हे सतत प्रयत्नशील असतात. आता तर ते भाजपचे जिल्हाध्यक्ष झालेले आहेत तसेच तालुक्याचे आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या विकासाची व्याप्ती आणि बळ हे वाढले आहे या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे हे पाहून आम्हाला आनंद होत आहे असेच कार्य त्यांनी सुरू ठेवावे. यासाठी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
राजकुमार झिंगाडे, अक्कलकोट