मैंदर्गीत ११ नोव्हेंबर ते २० पर्यंत आंतर राष्ट्रीय प्रवचनकार अभिनव गवी सिद्धेश्वर स्वामीजी यांचे प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन
दुधनी दि. ०६ : तालुक्यातील मैंदर्गी येथे दिनांक ११ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत दररोज सायंकाळी सहा ते साडेसात वाजेपर्यंत शिवचलेश्वर देवस्थान मैदानावर मैंदर्गीत कोप्पळ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय प्रवचनकार सुप्रसिध्द म.नि. प्र. अभिनव गवी सिध्देश्वर महास्वामीजी यांचे आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रम होणार आहे. या अनुषंगाने रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
हा प्रवचन कार्यक्रम जवळपास दहा दिवस चालणार असून, त्या दरम्यान दररोज सकाळी ०६.३० ते ८ वाजेपर्यंत मैंदर्गी परिसरातील जवळपास सात गावात प्रभात फेरी निघणार आहे. यात दुधनी, संगोळगी (ब), मादनहिप्परगा, बोरी उमरगे, सलगर, हतीकणबस, उडगीसह पादयात्रा निघणार आहे.या पदयात्रेत विविध मठाचे महास्वामीजीं उपस्थित राहणार आहेत.
मैंदर्गीच्या पंचक्रोशीतील गावात दररोज भजनी मंडळ समवेत प्रभात फेरी निघणार आहे. महास्वामीजींना निमंत्रण देण्यासाठी मैंदर्गी शहरातील जवळपास दिडशे लोकांनी कोप्पळ येथे जाऊन विनंती केली होती. त्या अनुषंगाने सदरील कार्यक्रम मैंदर्गी गावात स्वीकारले आहे. महास्वामीजी निमंत्रण स्वीकारल्याने मैंदर्गी शहर व परिसरातील गावातील ग्रामस्थांमध्ये उत्साहा संचारला आहे.
आता संपूर्ण मैंदर्गी शहर महास्वामीजींच्या प्रवचन कार्यक्रमाच्या तयारीला लागली आहे. महास्वामीजींचे विचार ऐकण्यासाठी पाच-पाच वर्षे वाट पहावी लागत होती. कोप्पळ येथील नियोजन समितीचे प्रमुखांनी मैंदर्गी शहरात येऊन जवळपास दिडशे लोकांची बैठक घेण्यात आले. मैंदर्गी शहरातील मुख्य ठिकाणांची पाहणी करून सर्वांनुमते प्रवचनासाठी जागा निश्चित करण्यात आली. या प्रवचन कार्यक्रमासाठी जागेची पाहणी करताना अक्कलकोट, मादनहिप्परगा, अणदूर, गुलबर्गासह आदी ठिकाणच्या महास्वामीजी उपस्थित होते.
हा प्रवचन कार्यक्रम समस्त मैंदर्गी शहरवासियांनी आयोजित केली आहे. प्रवचन साठी जागा निश्चित केली असून, महास्वामीजींचे प्रवचन ऐकण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अक्कलकोट तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून महास्वामीजींच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.