मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ करत वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. तसंच ठाण्यातही कार्यकर्ते आक्रमक झाले असून तणावाचे वातावरण आहे. विवियाना मॉलजवळ काही ठिकाणी रस्त्यावर जळलेले टायर्स टाकून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्नही झाला.
जितेंद्र आव्हाड हे ठाणे आणि कळवा या शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात गेले होते. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीला जितेंद्र आव्हाड वाट करून देत होते तेव्हा हा प्रकार घडला.
एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला वाट करून देताना महिलेच्या खाद्यांला हात लावून बाजूला केलं. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने यासंदर्भात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. महिला पदाधिकाऱ्याने ट्विटरवरूनही यासंदर्भात माहिती दिली आहे. रिदा रशीद यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांना जितेंद्र आव्हाड यांनी चारचौघात आपल्याला अपमानित केल्याचा आरोप केला आहे






