ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यपालपदी कोश्यारी राहिले तर महाराष्ट्र बंद करावा लागेल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारला दिला इशारा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. ‘भगतसिंह कोश्यारी यांचं सॅम्पल महाराष्ट्राबाहेर गेलं नाही तर महामोर्चा किंवा बंद सारखं आंदोलन करावं लागेल, असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारला दिला आहे.

”महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची अहवेलना होत आहे. आज अचानक कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्याच्या अंगात भूत संचारले. आम्ही गप्प बसायचे हे खूप झाले. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम होत आहे. आता केंद्राने चाळे बंद करावे. राज्यपाल कोश्यारी नको. त्यांना घरी किंवा वृद्धाश्रमात पाठवा. असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले,  महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो हे वेगळे सांगायची गरज नाही. आणि त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळगुळीत प्रतिक्रीया भाजपकडून दिल्या जात आहेत. आपल्या देशाचे कायदेमंत्री यांनी देशाच्या न्यायालयातील न्यायमूर्तीवरील नेमणुकीबद्दल मत व्यक्त केले. त्यात त्यांनी हे अधिकार पंतप्रधानांकडे हवे असे ते म्हणतात हे गंभीर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!