दुधनी दि. २८: श्री सिद्धेश्वर सहकारी बँक हे व्यापाऱ्यांची बँक असून इतर बँकापेक्षा चांगली सेवा देणारं बँक आहे. त्यामुळे शिवदारे पुरस्कृत सहकार पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक लागली असून ४ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा शुभारंभ दुधनी येथील श्री शांतलिंगेश्वर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हमाल भवन येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभीरे, लक्ष्मीपुत्र पाटील, बँकेचे संचालक शिवानंद कोनापुरे, बाळासाहेब आडके, पशुपति माशाळ, सिद्धेश्वर मुनाळे, इरप्पा सालक्की, महेश सिंदगी, प्रकाश हत्ती यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे बोलताना म्हणाले की, शिवदारे पुरस्कृत सहकार पॅनलचा निवडणूक चिन्ह ‘कपबशी’ असून ४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०८ ते सायंकाळी ०५ पर्यन्त मतदान करून शिवदारे पुरस्कृत सहकार पॅनलला पुन्हा एकदा संधि द्यावे, असे आवाहन माजी म्हेत्रे यांनी केले. त्यानंतर बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, नरेंद्र गंभीरे यांनीही मतदान करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी या निवडणुकीत किती सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत, याची माहिती देत मतदान कशा पद्धतीने करावे या संदर्भात माहिती दिली. गुरूशांतप्पा परमशेट्टी, गुरूशांत उप्पीन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी आडत व भुसार व्यापारी असिसियेशनचे उपाध्यक्ष राजशेखर दोषी, शिवानंद माडयाळ, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे चेअरमन चंद्रकांत येगदी, सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बसवराज इटकळे, महानिंगप्पा परमशेट्टी, श्रीशैल अंबारे, गुरुषांत ढंगे, गिरमल्लप्पा सावळगी, बसवण्णप्पा धल्लू, शिवशरणप्पा हबशी, जगदीश माशाळ, लक्षमीपुत्र पाटील, डॉ. उदय म्हेत्रे, संगमनाथ म्हेत्रे, संजय मंथासह बँकेचे सभासद, आडत व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन आडत व भुसार व्यापारी असिसियेशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी यांनी केले तर आभार मल्लिनाथ पाटील यांनी मानले.