ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बंद पाडाल तर लिंगायत समन्वय समिती राज्यभर आंदोलन करणार – अॅड अविनाश भोसीकर

सोलापूर : श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यास कटकारस्थान करून काही राजकीय दबावापोटी बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे श्री सिध्देश्वर साखर कारखाना हा सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी व कामगारांच्या जीवनाचा आधार आहे. तसेच जिल्हाच्या एकुण आर्थिक जडणघडण मध्ये महत्वाची भूमिका आहे. सध्या सोलापूर विमानतळ वरून जे काही आंदोलन चालू आहे, त्यामध्ये शेतकरी बांधवांच नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. सोलापूर विमानसेवा चालू करण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही. बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा उपलब्ध असताना शहरी भागात असणाऱ्या होटगी रोडवरील सोलापूर विमानतळाचा का आग्रह धरला जात आहे हे समजण्या पलीकडे आहे. चिमणी न पाडता विमानसेवा करु शकतो हे समस्त सोलापूरकर जाणून आहे.

सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचा कारभार हा अत्यंत पारदर्शी असून, उच्च दर देणारा कारखाना म्हणून श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारा हा साखर कारखाना काही नेत्यांना पाहवत नाही. यामुळेच गाळप हंगाम बंद पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. त्यामुळे कामगार, शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून माजी चेअरमन धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली कारखाना अत्यंत पारदर्शी कारभार करत आहे. हजारो शेतकऱ्यांचे भवितव्य ह्या कारखान्यावर अवलंबून आहे प्रशासनाने कारखाना बंद पाडला तर राज्यातला लिंगायत समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन करेल असे राष्ट्रीय समन्वयक अॅड अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषेदत माहिती दिली.

यावेळी लिंगायत समन्वय समीतीचे राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे, शहर समन्वयक सकलेष बाबुळगांवकर, लिंगायत ऑफीसर फोरम सचिन पेठकर, बसव ब्रिगेड शहर अध्यक्ष अमित रोडगे, प्रा. शिवलिंग अचलेरे, सिध्दाराम कटारे, थोंडाप्पा तोरणगी, बसवराज चाकाई, अजिंक्य उप्पीन आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!