---Advertisement---

जन्मदाते निघाले क्रूर, एका दिवसाच्या अर्भकाला दिले फेकून, हृदयद्रावक घटना

Follow Us:
---Advertisement---

नाशिक : नाशिकमधील चुंचाळे परिसरातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आई-वडिलांनी एका  चिमूकलीला जन्माला येऊन काही तासातच पिशवीत घालून कचऱ्यांसारखे फेकून पसार झाले. सदर घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काही वेळातच या चिमुकलीचे कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडल्याने अतिरक्तस्राव होऊन उपचारापूर्वीच तिने या जगाचा निरोप घेतला.

दत्तनगरात एक दिवसाच्या या बालिकेला रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला ताब्यात घेतले. या अर्भकाचा उजवा हात, पाय गुडघ्यापर्यंत कुत्र्यांनी खाऊन टाकला होता. तिची अवस्था पाहून पंचनामा करताना पोलिसांचेही डोळे भरून आले. या अर्भकाला पिशवीत घालून फेकण्यासाठी जात असताना दोघेजण सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!