---Advertisement---

अक्कलकोट अन्नछत्र मंडळात गणेश मंदिर यात्री – थांबाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.2 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे नेहमीच स्वामी भक्तांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देणारे न्यास संस्थापक जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना आखल्या जात आहेत, गणेश मंदिर यात्री-थांबा या इमारत नुतनीकरणाचे लोकार्पण मोठ्या थाटात संपन्न झाले.

दरम्यान सदर नुतनीकरण लोकार्पणाचे उद्घाटन स्वामीभक्त चंद्रकांत पाटील, मुलूंड (प), अनिल पाटील सपत्नीक, ठाणे (प) यांच्या हस्ते तर अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, दणगीदार अतिथी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी न्यासाचे पुरोहित अप्पु पुजारी, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, लाला राठोड, मनोज निकम, अप्पा हंचाटे, राजु पवार, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, अमित थोरात, बाबुशा महिंद्रकर, महादेव अनगले, विजय माने, बाळासाहेब पोळ, सिध्देश्वर जाधव, सिध्देशवर माने, रोहन शिर्के, रमेश हेगडे, पिटू साठे, गणेश होटकर, भिमाशंकर कामशेट्टी, लक्ष्मण निंबाळ, संतोष श्रीमान, राजेंद्र काटकर यांच्यासह देणगीदार, अतिथीगण, सेवेकरी, कर्मचारी वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोज निकम यांनी केले.

स्वामी भक्तांची उत्कृष्ठ व्यवस्था :

सदरच्या इमारतीत १२ AC खोल्या असून ,यामुळे परगावच्या स्वामी भक्तांना मागणी प्रमाणे, उत्तम सोयीसुविधा उपलब्द करण्यात आले असल्याचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!