ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारतीय नौदलाच्या मार्कोस कमांडो फोर्समध्ये लवकरच महिला अधिकारी होणार सहभागी

दिल्ली : नौदलाच्या मार्कोस कमांडो फोर्समध्ये लवकरच महिलांना संधी देण्यात येणार असल्याचा निर्णय नौदलाने घेतला असून या संदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. या संदर्भात माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहनीला दिली आहे.

भारतीय सशस्त्र दलांच्या तिन्ही विभागात स्पेशल फोर्स कार्यरत आहेत. अनेक अवघड मोहिमा या कमांडो फोर्स पार पाडत असतात. लष्कराच्या पॅरा कमांडोने पाकिस्तानातील सर्जिकल स्ट्रईक पार पडली होती. तसेच नौदलाचा मार्कोस आणि हवाई दलाच्या गरुड फोर्सने देखील अनेक महत्वाच्या मोहीमा पार पडल्या आहेत. या फोर्समध्ये आतापर्यन्त केवळ पुरुषांनाच सहभागी करून घेतल्या जात होते. मात्र, आता लवकरच या कमांडो फोर्समध्ये महिला देखील दिसणार आहेत.

या कमांडो फोर्सचे प्रशिक्षण अत्यंत कठीण असते. मोजक्याच अधिकारी आणि जवानांना हे प्रशिक्षण पूर्ण करता येत. आता या एलिट फोर्स मध्ये आता महिला सुद्धा दिसणार असून अतिशय अवघड मोहिमा आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला या पार पडतांना दिसतील. अद्याप या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसळी तरी भारतीय नौदल या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास हा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!