कुरनूर : म्हेत्रे परिवार आतापर्यंत समाजासाठी काम केलेला आहे. कुठल्याही प्रकारच राजकारण न करता समाजकारण करून लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारला आहे. त्यामुळे ही जनता कधीही विसरणार नाही. याची मला खात्री आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये जरी आमचा पराभव झाला असला तरी आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यासाठी आमचं काम निरंतर पणे चालू ठेवले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकी आमचा पराभव झाला ते आम्ही मान्य करूच. परंतु ह्याच लोकांनी आम्हाला निवडून देऊन सिद्धाराम म्हेत्रे यांना मंत्री केलेल आहे. हे आम्ही जनतेचे ऋण कधी विसरणार नाही. अजून निवडणुका लांब आहेत. तालुक्याच्या राजकारणावर मी संपूर्ण लक्ष ठेवून आहे.योग्य वेळ आली की माझी आक्रमकता दिसलेच. जशास तसे उत्तर दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी विरोधकांना दिला आहे.
येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणून म्हेत्रे यांना मंत्री करण्यासाठी म्हेत्रे परिवारातील युवा पिढी सज्ज आहे. समाजकारण म्हेत्रे परिवाराच्या रक्तात आहे.लोकांचे हित जाणणारे आम्ही आहोत. असे शितल म्हेत्रे यांनी विश्व न्यूज मराठी शी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना शितल म्हेत्रे म्हणाले की, भाजप सरकार मुळे देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे.सत्तेचा गैरवापर भाजप सरकार करताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना जनता निश्चितपणे यांची जागा दाखवतील यापूर्वी अशा प्रकारच राजकारण या देशांमध्ये झालं नाही. मात्र अलीकडच्या काळामध्ये केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून सुडाच राजकारण या देशांमध्ये सुरू आहे. याला वाचा फोडण्यासाठी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेला लोकांचा प्रतिसाद बघता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपचा सुफडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. याचा मला सार्थ विश्वास आहे असेही शितल म्हेत्रे म्हणाल्या.
समाजकारण करण्याची म्हेत्रे परिवाराची परंपरा
सत्ता येते आणि सत्ता जाते सत्तेच्या जोरावर नाही तर सत्ता नसताना देखील म्हेत्रे परिवार नेहमीच तालुक्याच्या विकासासाठी आणि लोकांसाठी काम केलेल आहे. म्हेत्रे परिवारातील युवा पिढी आता जोमाना कामाला लागले असून याच्या पुढच्या काळात त्याचे परिणाम दिसलच. म्हेत्रे परिवार पिढ्यान पिढ्या समाजकारण करत आल आहे. त्यामुळे ही पंरपरा कायम राखत आम्ही समाजासाठी झटतो.त्यामुळे आता म्हेत्रे परिवारातील युवा पिढी बाहेर पडली असून येणाऱ्या काळामध्ये सिद्धाराम म्हेत्रे यांना पुन्हा मंत्री केल्याशिवाय ही शितल म्हेत्रे आणि युवा पिढी शांत राहणार नाही.