---Advertisement---

ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत भाजपचे होळी आंदोलन

On: November 23, 2020 11:25 AM
Follow Us:
---Advertisement---

नागपूरः लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिल माफीसाठी आज राज्यातील विविध भागात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातही माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरले असून, ते ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांसह वीजबिलांची होळीसुद्धा केली आहे.

राज्यातील ठाकरे सरकारने सर्वसामान्य लोकांना  वीजबिलात सवत देण्याचे आश्वासन दिले होते.  परंतु हे सरकार आता पलटलं आहे. या सरकारनं दीड कोटी ग्राहकांवर अन्याय करण्याचा घाट घातला आहे, असा आरोप चंद्रशेखर वाबनकुळेंनी केला. लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिल माफीसाठी आज नागपूर जिल्ह्यात भाजपनं आंदोलन केलं. महावितरणने पाठवलेल्या वीजबिलाची यावेळी होळी करण्यात आली. कामठी मतदारसंघातील महादुला परिसरात वीजबिलाची ही होळी करण्यात आली, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. ‘राज्य सरकारने आठ दिवसांत थकीत वीजबिलाची चौकशी करावी, शेतकऱ्यांकडे थकीत असलेलं वीजबिल काही भ्रष्टाचार नाही, पण वीजबिल माफी करावी,’ अशी मागणी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार सहभागी झाले आहेत. यांच्यासह इतरही नेते या आंदोनलात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!