---Advertisement---

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नामांतरानंतर आणखी एका जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून हालचाली सुरू

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नामांतर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आणखी एका जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील दोन शहरांचं नामांतर होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता आणखी एका शहराचं नामांतर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगरचं नाव बदलण्याबाबत शिंदे फडणवीसांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारनं अहमदनगर महापालिकेला पत्र पाठवून महासभेत नामांतराचा प्रस्ताव पास करून राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत. हिवाळी अधिवेशनात अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारकडे केली होती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारनं महापालिकेला नामांतराबाबतचा ठराव बहुमतानं पारित करून सरकारला सादर करण्याचे आदेश दिले आहेत

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!