ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांच्या सहकार्यानेच गोकुळची अडचण दूर ; चेअरमन दत्ता शिंदे यांचे प्रतिपादन ; चपळगावातील भुमिपुत्रांकडुन सत्कार

 

विशेष प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१८ : गोकुळ शुगरचे संस्थापक स्व.भगवानभाऊ शिंदे यांच्या अकाली निधनानंतर कारखान्याच्या वाटचालीवर परिणाम झाला होता.भविष्यात काय होईल याची नुसती कल्पना केली तरी धडकी भरायची.परंतु अशा अडचणीच्या प्रसंगी शेतकऱ्यांनी केलेले सहकार्य लाखमोलाचे
ठरले म्हणूनच आज कारखान्याची वाटचाल सुस्थितीत आहे,असे प्रतिपादन गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी केले.वेळेत ऊसबिलाची पुर्तता केल्याबद्दल आणि मागील वर्षीच्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना १२१ रुपये प्रतिटन बक्षीस म्हणून खात्यावर रक्कम जमा केल्याबद्दल चपळगाव व पंचक्रोशीतील भुमिपुत्रांकडून चेअरमन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कुमारप्पा पाटील होते.तर व्यासपीठावर इसहाक पटेल,बसवराज बाणेगाव,मोट्याळचे सरपंच कार्तिक पाटील,राजु चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते सिध्दाराम भंडारकवठे,माजी चेअरमन संजय बाणेगांव,महादेव वाले,विशालराज नन्ना,
शेतकी अधिकारी फकरोद्दीन जहागीरदार,महेश माने,भुमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बाणेगांव,खंडप्पा वाले,दयानंद फताटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज बाणेगांव यांनी केले.पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी ऊसाची शेती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करावी.तसेच योग्य जातीचा ऊस व नियोजन व्यवस्थित केल्यास शेतकरी,कारखानदार कधीही अडचणीत येणार नाहीत.गोकुळ शुगरच्या माध्यमातून भविष्यात कृषीपुरक उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.यावेळी कुमारप्पा पाटील,
इसहाक पटेल, बसवराज बाणेगांव,सिध्दाराम भंडारकवठे,राजु भंगे आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश इंगुले, शरणप्पा ख्याडे,ब्रम्हानंद म्हमाणे,धानप्पा डोळ्ळे,श्रीकांत पाटील,सुभाष बावकर,विजय कांबळे,ईरप्पा भंगे, रितेश ताडमारे,अंबण्णा डोळ्ळे,गंगाराम भोसले आदींनी सहकार्य केले.सुत्रसंचालन शंभुलिंग अकतनाळ यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!