---Advertisement---

हिळळी भागातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित;शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार

Follow Us:
---Advertisement---

 

 

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट तालुक्यातील हिळळी येथे सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार पवार यांना देण्यात आले.यावर चौकशी होऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असल्याचे सरपंच आप्पासाहेब शटगार यांनी सांगितले.अक्कलकोट तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने या भागात पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.याबाबत प्रशासनाकडून पंचनामेही झाले होते परंतु तालुक्याच्या अनेक भागात मदत मिळाली
पण हिळळी व आसपासच्या गावांमध्ये
मात्र अद्याप मदत मिळाली नाही.
हिळळीतील शेतकरी या मदतीपासून
वंचित आहेत,अशी तक्रार सरपंच शटगार
यांनी तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा,असे
त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी वासू कुलकर्णी,ओमणणा बाके, श्रीशैल शटगार, हणमंत शटगार,विणू कुलकर्णी,अब्दुल रहेमान नागुर,मोनप्पा सुतार यांच्यासह
शेतकरी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!