---Advertisement---

नैराश्येतूनच सरनाईकांवर ईडीच्या धाडी ; शरद पवार

On: November 24, 2020 9:34 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून नैराश्येतून सरनाईकांवर ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत. बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशीही टीका शरद पवारांनी केली आहे. “महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी केला. लोकांची बांधिलकी ठेवण्याचे काम सरकार करत असून राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घेत काम करत आहे,” असंही शरद पवार यांनी म्हटलं. राज्यात आज जे सरकार आहे त्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!