---Advertisement---

पुणे – सोलापूर महामार्गावरील अपघातात अक्कलकोट तालुक्यातील तिघांचा मृत्यू

Follow Us:
---Advertisement---

कुरनूर : पुण्यातील चौफुला येथे झालेल्या सोलापूर पुणे भीषण अपघातामध्ये अक्कलकोट तालुक्यातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चपळगाव येथील आरती अंबण्णा बिराजदार अतिशय कष्टातून शिक्षण घेत पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करीत होती. तर सलगरचे गावचे सुपुत्र पुणे मार्केट यार्ड येथील आडत व्यापारी गणपती पाटील व गोगाव येथील अमर महांतेश कलशेट्टी अशा तिघांचे या अपघातामध्ये मृत्यू झाल्याने त्यांच्या गावात आणि अक्कलकोट तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एक लक्झरी बस काल पहाटेच्या सुमारास सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जात होती. याचवेळी चौफुला ओलांडल्यानंतर वखारी हद्दीत एका ट्रकचा टायर फुटल्याने तो ट्रक महामार्गावरच उभा होता. या उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज बसच्या चालकाला आला नाही. त्यामुळे बस थेट ट्रकला जाऊन धडकली आणि यात अक्कलकोट तालुक्यातील तिघांवर काळाने घात केला आहे. अपघात झाल्यानंतर काही जखमींना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!