दलित वस्ती सुधारणा योजनेतर्गत दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी 4 कोटी 35 लाखांचा निधी ; आमदार सुभाष देशमुख यांची माहिती
सोलापूर : सामाजिक न्याय व सहाय्यक विशेष विभागाकडून दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सुमारे 4 कोटी 35 लाखांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. आ. सुभाष देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आ. देशमुख यांनी दहा कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र पहिल्या टप्प्यात चार कोटी पस्तीस लाखांचा निधी विधानसभा मतदारसंघ करिता मंजूर झाला आहे.
निधी मिळालेल्या कामात दोड्डी वस्ती येथे दलित वस्तीत व्यायाम शाळा बांधणे, बरूर येथे पाणीपुरवठा सोय करणे बाणेगाव मागासवर्गीय स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता कॉंक्रीटीकरण करणे, कारकल दलित वस्ती स्मशानभूमीत बॉल कंपाऊड करणे, गुजेगावमध्ये समाज मंदिरापर्यंत पेव्हर बसविणे, चिंचपूर भिमनगर येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे, दिंडूर येथे डॉ. बाबासाहेब आंबडेकर नगर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, कुंभारी दलित वस्तीत सिमेंट रोड करणे, हत्तरसंग येथे समाजमंदिर ते सातप्पा विजय माने घरापर्यंत रस्ता तयार करणे, हगलूर स्मशानभुमी सुशोभिकरण करणे शहर उत्तर सोलापूर मातंगवस्ती व्यायामशाळा साहित्य खरेदी करणे, दारफळ स्मशानभूमी सुशोभिकरण करणे, डोणगाव परिसरात कॉंक्रीटीकरण करणे, पाकणी येथील विश्वनाथ नगर येथे बंदिस्त गटार करणे, कवठे येथे शिवाजी पारसे घर से भारत पारसे घर रस्ता करणे, कवठे येथे अमोगसिध्द कांबळे घर ते सोलापूर जोड रस्त्यापर्यंत रस्ता करणे, पाथरीमध्ये चंद्रकांत मसलखांब घर ते सातप्पा मसलखांव पर कॉक्रिट रस्ता करणे, पाथरी हरिजन वरती महादेव मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे, तिर्हे भिम नगर मध्ये येथे ग्रामपंचायत जागेत वाचनालय बांधणे, डोणगाव हरिजन वस्तीमध्ये यल्लम्मा मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक टाकणे, डोणगाव येथे होलार वस्ती कॉंक्रीट रस्ता करणे, कुसुर मातंग वस्ती समाज मंदिर ते सुभाष घाडगे रस्ता करणे, कुसुर खानापुर रस्ता ते नगनाथ कांबळे घर रस्ता करणे, हत्तुर येथे भिम नगर मध्ये भूमिगत गटार बांधणे, औज चांभार वस्ती येथे भूमिगत गटार बांधणे, औज बेघर वस्ती येथे भूमिगत गटार बांधणे, औराद दलित स्मशानभूमी दहन शेड बांधणे, औराद येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॉंक्रीटकरण करणे, होटगी स्टेशन येथे पटणे वस्ती येथे निमाशंकर बनसोडे घर ते उमेश शेकापूर घर कॉंक्रीट रस्ता करणे, होटगी स्टेशन पटणे वस्ती येथे आकाश बनसोडे घर ते वाबुशा शिंदे घर रस्ता कॉंकीट रस्ता करणे, इंगळगी येथे भिमनगर येथे बुध्द विहार सुशोभीकरण करणे, इंगळगीत चांभार समाजाकरिता मड्डी वस्ती येथे निवारा शेड बांधणे, मनगोळी येथे दलित वस्तीमध्ये भूमिगत गटारी बांधणे, मनगोळी दलित वस्तीमध्ये कॉंक्रीट रस्ता करणे, वांगी दलित वस्तीमध्ये ग्रामपंचायत जागेत समाजमंदिर बांधणे, होनमुर्गी दलित वस्ती ते सिना नदीपर्यंत बंधिस्त गटार करणे, होनमुर्गी येथे समाज मंदिरसमोर पेव्हर ब्लॉक टाकणे, होनमुर्गी येथे दलितवस्ती दावल मलिक दर्गासमोर पेव्हर ब्लॉक टाकणे, टाकळी दलित बस्ती कोळी वस्ती शाळेपर्यंत रस्ता करणे, कंदलगाव दलित वस्तीमध्ये कॉंक्रीट रस्ता करणे, कणबस बुद्ध विहार परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, भंडारकवठे हरिजन बस्तीमध्ये ग्रामपंचायत जागेत सभामंडप बांधणे, होटगी भिम वस्ती मध्ये कॉंक्रीट रस्ता करणे, होटगी मड्डी वस्ती मध्ये चांभार गल्लीत कॉंक्रीट रस्ता करणे, लवंगी येथे दलित वस्ती मध्ये कॉंक्रीट रस्ता करणे, मंद्रुप चर्मकार समाज स्मशानभूमी येथे पेव्हर ब्लॉक टाकणे, मंद्रुप मातंग वस्ती मरिआई मंदिरासमोर ग्रामपंचायत जागेत सभामंडप बांधणे, मंद्रुप येथे अण्णा काळे घर ते गोपाळ कांबळे घर रस्ता करणे, अकोले (मं) होटगी येथे आनंदनगर हरिजन वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत सभामंडप बांधणे, याशिवाय मद्रे, गुंजेगाव, यत्नाळ, वडकबाळ, तेलगाव, येळेगाव, कुरघोट, संजवाड, निंबर्गी गावातील विविध कामांचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यात आणखी निधी मिळणार: आ. देशमुख
दक्षिण विधानसभा मतदारसंघात दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 4 कोटी 35 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. हा पहिला टप्प्यातील निधी आहे दुसऱ्या टप्प्यातही आणखीu मिळणार आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कायम कटिबद्ध असणार आहे असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.