---Advertisement---

जेष्ठ नेते दत्तात्रय तानवडे यांची जयंती शिरवळ येथे विविध उपक्रमांनी साजरी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.७ : भाजपचे ज्येष्ठ नेते कै. दत्तात्रय तानवडे यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त शिरवळ (ता.अक्कलकोट) ग्रामपंचायत कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त अक्कलकोट शहरात गरजूंना तानवडे परिवारातर्फे अन्नदानाचे वाटप रॉबिन हूड आर्मी व जय हिंद फूड बँक यांच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच वैद्यकीय दवाखान्यात उपयुक्त वैद्यकीय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी प्रतिमा पूजन चिदानंद कवडे व शिवशरण जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी अनेकांनी तानवडे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला .याप्रसंगी घरोघरी त्यांच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदजी तानवडे, माजी सरपंच बसवराज तानवडे, प्रशांत तानवडे, शिवानंद पटणे, आप्पाशा देवकर, राजू ढंगापुरे, प्रकाश बाबशेट्टी, डॉ.दयानंद कुडले, महेश पाटील, पंचप्पा बिराजदार, अप्पू निंबर्गी, दयानंद ढंगापुरे, नरेश बिराजदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांते यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य,कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!