---Advertisement---

जीवनाच्या संघर्षात स्वामी भक्तीने समाधान लाभले – ज्ञानदा कदम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : आज पर्यंत जीवनात आई-वडिलांकडून सर्व सुख समाधान लाभले आहे. असे असले तरी अँकरिंग क्षेत्रात करिअर बनविताना बरेच आव्हानात्मक संघर्षांना सामोरे जावे लागल्याने अनेक वेळा मानसिक संघर्षाची तयारी ठेवावी लागली. अशा प्रसंगात मला स्वामी भक्तीने तारले. कारण स्वामी समर्थांची मी एक निस्सीम भक्त आहे. यामुळे कोणत्याही प्रसंगात मन स्थिर ठेवण्याची शक्ती स्वामीभक्तीतून मिळाली. त्यामुळे माझ्या जीवनाच्या संघर्षात स्वामी भक्तीने समाधान लाभले असल्याचे प्रतिपादन ए.बी.पी.माझा न्युज चैनलच्या प्रसिद्ध व मुख्य निवेदक ज्ञानदा कदम यांनी केले.

ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी ज्ञानदा कदम व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रवीण देशमुख, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ आदींसह कदम कुटुंबीय उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!