---Advertisement---

जयहिंद शुगरच्या मार्गदर्शन शिबीरास शेतकऱ्यांचा प्रतिसादसुवर्ण कृषी एकरी शंभर टन ऊस प्रकल्प सुरू

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१९ : अलीकडच्या काळात उस उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यास ऊस उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते या उद्देशाने आचेगाव (ता.दक्षिण सोलापुर) येथील जयहिंद शुगरच्या वतीने सुवर्ण कृषी एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.यास अनुसरून शेतकरी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.या प्रशिक्षण शिबीरात कृषीरत्न पद्मविभूषण डाॅ.विजय भाटकर यांनी विकसीत केलेल्या या प्रकल्पाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.डाॅ.अमोल पाटील यांनी मार्गदर्शन करताना अतिवृष्टी,अवर्षण परिस्थिती यावर मात करून रासायनिक खतांचा स्पिलीट पध्दतीने वापर करणे.यासह डी-कंपोजर,जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढ करून एकरी ९९०० रूपये वार्षिक खर्चात १०० टन ऊस उत्पादन घेणे शक्य
असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चेअरमन गणेश माने देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबीर आयोजित केल्याची माहिती कार्यकारी संचालक बब्रुवान माने देशमुख यांनी दिली.यावेळी मार्गदर्शक शालिवाहन
माने देशमुख,विजय पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी आर पी देशमुख,निखिल तळे,महेश पाटील,किशोर कुलकर्णी,दयानंद पवार यांच्यासह अक्कलकोट,दक्षिण सोलापूर तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

येत्या शनिवारी अक्कलकोट
येथे मार्गदर्शन शिबीर

सुवर्ण कृषी एकरी शंभर टन ऊस हा
प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.उत्पादन घटल्यामुळे कारखानदारीवर देखील परिणाम होत आहे.या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आधार मिळेल.येत्या शनिवारी
२५ फेब्रुवारी रोजी कारखान्याच्यावतीने अक्कलकोट येथील शरणमठात सकाळी १० ते २ या वेळेत तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!