---Advertisement---

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या ”त्या” आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Follow Us:
---Advertisement---

नांदेड : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण नवीन धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, तसंच घातपाताचा प्रयत्नही केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, माझ्या मंत्रीपदाच्या काळातील लेटरहेडचा गैरवापर सुरू आहे. सही कायम ठेवून त्यातला मजकूर बदलण्याचे प्रकार सुरू आहेत. बनावट लेटरहेड फिरवून मी मराठा समाजाच्या विरोधात आहे, असा संभ्रम निर्माण करण्याचा गलिच्छ प्रकार सुरू आहे. एवढेच नाही, तर याचा मेटे करा, अशा चर्चा देखील केल्या जात आहे, असा खळबळजनक आरोप माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी अर्धापूर येथील एका कार्यक्रमात केला आहे.

माझ्या राजकीय विरोधकांकडून मला संपवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी नांदेड पोलिसात मी तक्रार दाखल केली आहे असे चव्हाण म्हणाले. मी सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. या बाबीची कुणकुण मला अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही मला मिळाले होते. त्यामुळे मी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणाची ३१ जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे.

आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने मी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली. ज्याअर्थी माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले, त्याअर्थी पुढील काळात खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अनेक निवडणुका असून, राजकीय दृष्ट्या प्रतिमाहनन व जनतेत गैरसमज निर्माण करण्यासाठी हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा माझा संशय आहे.

बनावट पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. सदर बाबीचे गांभीर्य व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेता या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी माझी मागणी आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि नांदेडमध्ये माझ्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. सदरहू व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, अशीही शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी दखल घेऊन तातडीने कायदेशीर दृष्ट्या योग्य कार्यवाही करावी, अशीही माझी मागणी आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!