ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डोंबरजवळगेत जल संजीवनी अंतर्गत १५० शेतकऱ्यांना तुषार संचचे वितरण

अक्कलकोट, दि.२३ : युनायटेड वे मुंबई यांच्या अंमलबजावणी मधील जल संजीवनी प्रकल्प अंतर्गत कोवेस्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अर्थसहाय्याने १५० शेतकऱ्यांना तुषार संचचे वितरण करण्यात आले. या वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ या प्रकल्पातील डोंबरजवळगे या गावातून करण्यात आला.

या तुषार संच वितरण कार्यक्रमासाठी कोवेस्ट्रो सीएसआरचे शिरीष जैन, कविता देसाई, युनायटेड वे मुंबई संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट अजय गोवले, मॅनेजर मुकेश देव, सरपंच चिदानंद माळगे, ग्रामसेवक विनोद डावरे, महालक्ष्मी जलसंधारण संस्थेचे अध्यक्ष हिमायत जमादार,अश्रफअली पटेल आदीसह जल संजीवनी टीम आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक टीम लीडर भिमाशंकर ढाले आणि सूत्रसंचालन समूह संघटक अजिज तांबोळी यांनी केले.

शेतकऱ्यांचे कमी पाण्यात अधिक उत्पादन व्हावे, भूगर्भातून पाण्याचा उपसा कमी व्हावा आणि शेतीला शाश्वत पाणीपुरवठा व्हावा हा उद्देश समोर ठेवून जल संजीवनी कडून कोवेस्ट्रोच्या साह्याने तुषार संच वितरण कार्यक्रम राबविण्यात आला. यासाठी प्रकल्पातील तीर्थ, डोंबरजवळगे, बऱ्हाणपूर आणि हालहळ्ळी या गावातून आतापर्यंत २६० शेतकऱ्यांनी तुषार संचची मागणी करून नोंदणी केली आहे. त्यामधील १५० शेतकऱ्यांना संचचे वितरण करण्यात आले आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांचे वितरण सुरू आहे. २८ हजार रुपये किंमतीच्या तुषार संचामध्ये शेतकरी सहभाग ७५०० रुपये (एकूण किमंतीच्या २७ टक्के) असून उर्वरित रक्कम प्रकल्पातून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!