ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतक-यांना योग्य मोबदला दया, अन्यथा रस्त्यावर उतरु : शितल म्हेत्रे ; तहसीलदारांना दिले निवेदन

अक्कलकोट, दि.१ : चेन्नई सुरत ग्रीन फिल्ड हायवे बाबत जोपर्यंत तालुक्यातील शेतक-यांना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या सरकारच्या विरोधात वेगवेगळया पध्दतीने आंदोलन करुन शेतक-यांना योग्य मोबदला देण्यास भाग पाडू, असा इशारा अक्कलकोट तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शितल म्हेत्रे यांनी दिला. तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने म्हेत्रे यांनी पुढाकार घेऊन तहसीलदारांना निवेदन दिले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे तालुक्यातील सोळा गावातून जात आहे. यासाठी या गावातील शेतक-यांचे शेत अधिग्रहण करण्यासाठी शासनाकडून शेतक-यांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. यात कोरडवाहू शेतक-यांना एकरी ३ लाख तर बागायतदार शेतक-यांना एकरी ५ लाख रुपये इतके मोबदला देणार असल्याचे कळविले आहे अशा प्रकारची नोटीस पाठवून तालुक्यातील शेतक-यांची एकप्रकारे क्रूर चेष्टा शासन करीत आहे. याबाबत काँग्रेस पक्षाकडून आवाज उठवत तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार सिरसट यांना निवेदन देऊन समृद्धी महामार्ग प्रमाणेच याही शेतक-यांना मोबदला देण्याची मागणी निवेदनव्दारे करण्यात आली. शेतक-यांच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे म्हणून डांगोरा पिटणारे याप्रकरणी मूग गिळून गप्प का बसले, अशा फसव्या सरकारला त्यांची जागा दाखविल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही.

यावेळी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी शहरअध्यक्ष बसवराज अळ्ळोळी, बाबासाहेब पाटील, मुबारक कोरबू, रामचंद्र समाणे,मैनोद्दीन कोरबू, शबाब शेख, शाकीर पटेल, अरुण जाधव, सर्फराज शेख, अलिबाशा अत्तार, वसंत देढे, आयाज चंदनवाले, नितेश राठोड, विकी कोरे, विकास मोरे, सद्दाम शेरीकर यांच्यासह अक्कलकोट शहर व तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!