अक्कलकोट, दि.३ : लायन्स मल्टिपल कौन्सिलची दोन दिवसीय राज्यस्तरीय बैठक अक्कलकोट येथील डी ग्रीन व्हीलेज रिसॉर्ट येथे पार पडली. या बैठकीत चार प्रांत मिळून केलेली कामे यावर चर्चा करण्यात आली. कामाचे मूल्य मापन करण्याबरोबरच भविष्यातील विविध प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली.
चेअरमन दिलीप मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे यजमान व नियोजन डिस्ट्रिक्ट ३२३४ डी १ यांच्याकडून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्ह्णून राजशेखर कापसे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आले. यावेळी माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रवीण छाजेड, डॉ. नवल मालू,नरेंद्र भंडारी, महावीर पटणी, विवेक अभ्यंकर, अशोक मेहता उपस्थित होते.
या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.राज्यस्तरीय बैठकीच्या आयोजनाल्याबद्दल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कापसे,कौन्सिल चेअरमन मोदी यांचे सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमास प्रांतपाल राजेश कोठावडे, प्रांतपाल श्रवणकुमार, प्रथम उपप्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर, प्रथम उपप्रांतपाल सुनील देसर्डा, प्रथम उपप्रांतपाल परमानंद शर्मा, द्वितीय उपप्रांतपाल एम के पाटील, द्वितीय उपप्रांतपाल सुनील चेकर, सुनील वोरा, डॉ लक्ष्मीकांत राठी, जगदीश पुरोहित, डॉ गुलाबचंद शहा, राज मुछाल, जितेन्द्र दोशी, प्रभाकर अंबेकर,अभय शास्त्री, चंद्रकांत सोनटक्के, विजय पालीवाल, विनोद वर्मा आदींची उपस्थिती होती.बैठकीच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र शहा,मल्लिकार्जून मसूती, डॉ.सुनील बिरादार, अशोक भांजे, शिवशरण खुबा, रमेश जैन, प्रभाकर मजगे,राजशेखर हिप्परगी आदींनी प्रयत्न केले.