---Advertisement---

कसबा पोटनिवडणुकीतील यशानंतर अक्कलकोटमध्ये महाविकास आघाडीचा जल्लोष

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : पुणे कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्याबद्दल अक्कलकोट शहरात विजयी जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाके फोडून आणि लाडू भरून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना मित्र पक्षाच्यावतीने अक्कलकोट बस स्टँड समोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

हा निकाल म्हणजे राज्याच्या आगामी निवडणुकीत परिवर्तनाची नांदी आहे. सरकारच्या हुकूमशाहीला जनता आता कंटाळली आहे त्याला असेच सर्वत्र उत्तर मिळेल, असा विश्वास माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केला आहे. कसबा मतदार संघातील जनतेने योग्य निर्णय घेतला आहे. तेथील जनतेने खऱ्या अर्थाने सरकारला उत्तर दिले आहे, असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष
दिलीप सिद्धे यांनी सांगितले.

शहरात झालेल्या या कार्यक्रमास काँग्रेस शहराध्यक्ष बसवराज आळोळी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुबारक कोरबु, शहर अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष राहुल मोरे, शिवराज स्वामी, युसुफ जमादार, मनोज पवार, मल्लिनाथ खुबा, स्वामीराव मोरे, शिवशरण इचगे, अलिबाशा अत्तार, नितीश राठोड, शाकीर पटेल, शिवराज पोमाजी, सतीश चिंचोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!