---Advertisement---

अरे बापरे….एकाच क्रिकेट संघातील ६ जण कोरोना पॉझिटिव्ह

On: November 26, 2020 2:08 PM
Follow Us:
---Advertisement---

न्यूझीलंड दौऱ्यावर पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पाक संघातील सहा सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यामुळे त्यांना सरावाची परवानगी नाकारण्यात आली आहे.

दिलेल्या माहितीनुसार ख्राइस्टचर्चमध्ये असलेल्या पाकिस्तान संघातील सहा जणांना करोना झाला आहे. पाकिस्तान संघातील या सहा जणांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोना निकाल पॉझिटिव्ह आल्याने पाकिस्तान संघाला याआधी देण्यात आलेल्या सरावाची परवाानगी आता नाकारण्यात आली.

पाक संघ लाहोरमधून निघताना सर्वांची करोना चाचणी झाली होती. तेव्हा सर्वांचा रिपोर्ट नेगेटिव्ह होता. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पाक संघातील कोणाला करोना झाला आहे याची माहिती सार्वजनिक केली नाही. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार पाक संघातील काही सदस्यांनी आयसोलेशनच्या नियमांचे उल्लंघन केले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!