अक्कलकोटच्या राजेराय मठात धर्मसंकीर्तनाला प्रारंभ ; स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
अक्कलकोट, दि.७ : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ राजेराय मठ श्रीक्षेत्र अक्कलकोट यांच्यावतीने बुधवार दि.१९ एप्रिल पर्यंत दैनंदिन धर्म संकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. शरद फुटाणे यांनी दिली.
या सोहळ्याला ६ एप्रिल पासूनच प्रारंभ झाला आहे. उद्या ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शिवानी ढेरे कोल्हापूर यांचे भक्ती संगीत, रविवार दि. ९ रोजी श्री सातारकर महिला भजनी मंडळ सोलापूर यांचे भक्ती संगीत, सोमवार दि.१० एप्रिल रोजी विजयाताई दुधगीकर सोलापूर यांचे भारुड, मंगळवार दि.११ एप्रिल रोजी स्वकुल साळी समाज भजनी मंडळ अक्कलकोट व श्री विठ्ठल मंदिर महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांचे भक्ती संगीत, बुधवार दि.१२ एप्रिल रोजी श्री शिवलिंग भजनी मंडळ सोलापूर यांचे भक्ती संगीत, गुरुवार दि.१३ एप्रिल रोजी ओम बेला समर्थ भजनी मंडळ अक्कलकोट यांचे भक्ती संगीत, शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ समर्थ नगर अक्कलकोट यांचे भक्ती संगीत, शनिवार दि.१५ एप्रिल रोजी ह.भ.प श्रीहरी नाशिककर महाराज सोलापूर यांचे कीर्तन, रविवार दि.१६ एप्रिल रोजी सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांचे भक्ती संगीत, सोमवार दि.१७ एप्रिल रोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांचे भक्ती संगीत तसेच मंगळवार दि.१८ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे.
या निमित्त पहाटे दोन वाजता काकड आरती पहाटे अडीच ते चार श्रींची महापूजा सकाळी दहा वाजल्यापासून श्री स्वामी समर्थ नामावली पठण व चैतन्य पादुकांवर सामुदायिक अभिषेक, दुपारी बारा वाजता महानैवद्य व महाआरती, दुपारी साडेबारा ते तीन या वेळेत महाप्रसाद आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत श्री स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोहळा होणार आहे.
बुधवार दि.१९ एप्रिल रोजी गोपाळकाला समस्त भजनी मंडळाच्यावतीने करण्यात येणार आहे.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष विकास दोडके, सचिव डॉ. किसन झिपरे, विश्वस्त डी.एस जयदेव, भुवनेश वर्दे, ऍड.अनिल मंगरूळे, दत्तात्रय मोरे,वत्सला मोरे, बिल्वराज नाबर, विजयकुमार गाजूल, राजकुमार रामन हे प्रयत्नशील आहेत.
परमपूज्य सद्गुरु बेलानाथ बाबांची पुण्यतिथी
परमपूज्य सद्गुरु बेलानाथ बाबांचा पुण्यतिथी महोत्सव देखील दि.१४ मे ते २२ मे च्या दरम्यान या मठामध्ये आयोजित करण्यात आला आहे.यावेळी श्री साई सच्चरित पारायण, सत्संग, भक्तिसंगीत, प्रवचन, अखंड विना सप्ताह, महाप्रसाद, पालखी रथोत्सव इत्यादी कार्यक्रमाने साजरा होत आहे.याचाही सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.